कळंब (प्रतिनिधी)-  रुग्णांना बाहेरील औषधे लिहून देण्याचा नवीन प्रकार कळंब उपजिल्हा रुग्णालयात सुरु झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अनागोंदी कारभाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले असून वरिष्ठ अधिकारी यावर कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे.

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना व्यवस्थित न बोलणे रुग्णांना अरेरावी करणे व बाहेरून एकाच मेडिकल मधून औषध घेऊन या म्हणून रुग्णांना सांगणे अशा अनेक तक्रार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे ज्ञात आली असून, यावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतात का नाही बघणे गरजेचे आहे.

कळंब येथील समाज सेवक संजीत मस्के यांनी दि 4 ऑगस्ट रोजी प्रसूती साठी एका महिलेला या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. तेथे मात्र डॉक्टर व सर्व कर्मचारी हे झोपले होते. बऱ्याच वेळानंतर त्या रुग्णाला उपचार मिळाला. मात्र आता त्याच डॉक्टर ने सर्व रुग्णांना बाहेरील एकाच मेडिकल मधून औषधे घेऊन येण्यासाठी सांगतात. सर्व रुग्णांना एक सारखाच उपचार व एकसारखीच औषधे देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय रुग्णालय हे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सोयी साठी असून शासकीय औषधाचा वापर करून रुग्णांना बरे करण्याचे काम येथील डॉक्टर यांचे असून या उपजिल्हा रुग्णालयात बाहेर खाजगी मेडिकल वाल्याना जगवण्याचे व स्वतःचे कमिशन काढण्याचे काम हे डॉक्टर करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर हे रुग्णांना बस स्थानकासमोरील एकाच मेडिकल मधून औषधें घेऊन येण्यासाठी सांगतात व त्या चिठ्ठीच्या पाठीमागे त्या मेडिकलचे नाव लिहून देतात. 



मी माझ्या मुलाला ताप आली म्हून गेल्या दोन दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट केले असून येथी उपचार करणारे डॉक्टर हे मला बाहेरच्या मेडिकल मधून औषधे व रक्त तपासणी सांगत आहेत. माझी ऐपत खाजगी दवाखान्यात दाखवण्याची असती तर मी माझ्या मुलाला शासकीय रुग्णालयात कशाला ऍडमिट केले असते. हा प्रकार तात्काळ बंद करण्यात यावा म्हणजे आमच्या गरिबांची सोय होईल.

बप्पा कांबळे,रुग्णाचे नातेवाईक कळंब.

 
Top