धाराशिव (प्रतिनिधी)-तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे दिनांक 10/8/2024 रोजी येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये प्रथम क्रमांक व 17 वर्ष वयोगट मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळाऊन यश संपादन केले. व या दोन संघाचीपुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांनी फुटबॉल मध्ये चांगली कामगिरी केली.या सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, यशवंत निंबाळकर, मयूर अंतरेड्डी यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.