वाशी (प्रतिनिधी)- जि.प.प्रा.शाळा पारडी येथे आज शनिवार (दि.3) रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना एखादी आपत्ती आल्यानंतर घाबरून न जाता आलेल्या आपत्तीचे दुष्परीणाम कमी व्हावेत, अगर होऊच नयेत म्हणून आलेली परिस्थिती कशी हातळावी, अचानक आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याचे पोष्टर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
आज मुलांनी खूप जाणीवपूर्वक,काळजीपूर्वक व हळव्या मनाने आपत्तीव्यवस्थापन स्वत: समजून घेतलेले दिसून आले.तसेच जीवनात शिक्षणाचा ऊपयोग करण्याची धडपड दिसून आल्याचे उर्मिला भोसले-कावळे यांनी सांगितले. अनेक उपक्रमांमधे हा एक अतिशय उपयुक्त उपक्रम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून घेतला गेला त्याचा नक्कीच फायदा मुलांना आणि मुलांमार्फत त्यांच्या कुटूंबीयांना होईल. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम नागटिळक यांच्यासह उषा डिसले, उर्मिला भोसले-कावळे,बाबुराव माने, बापुराव कात्रे,ज्ञानराज घुले,वैभव सोणवणे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.