धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकले असून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून ते चाचपणी करण्यासाठी 'भूम परंडा वाशीच बोला एकत्र चला' या टॅगलाईन खाली दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याची सुरुवात ईट येथून सुरू केली असून निपाणी, लांजेश्वर, आंद्रुड, माळेवाडी, पखरूड, ज्योतिबाचीवाडी, ईराचीवाडी, उमाचीवाडी, मात्रेवाडी, नागेवाडी, वडाचीवाडी, पांढरेवाडी, झेंडेवाडी, डोकेवाडी, गिरवली, सोन्नेवाडी, चांदवड, घाटनांदूर, गिरलगाव या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपीचे तपासणी शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या.
या तपासणी शिबिरास जवळपास 2500 पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ.आप्पासाहेब हुंबे, उपसरपंच प्रमोद देशपांडे, मा.सरपंचपती दत्ता अहिरे, गटनेते सयाजीराजे हुंबे,महेश चव्हाण, विनोद वाडकर ,ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण,अण्णासाहेब चव्हाण, अण्णासाहेब चोरमले, श्रीमंत डोके, दत्ता आसलकर,हायेत भाई पठाण, विकास चव्हाण ,सोनू चव्हाण,शामराव देशमुख जयराम डोके, सुनील देवकते, गवळी सर,धनंजय चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचे डॉ.प्रतापसिंह पाटील हे 41 दिवस भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून 248 गावांमध्ये ते भेटी देणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या समजावून घेऊन त्या निवारण करण्यासाठी काय करता येईल यासाठी देखील एक सोबत तज्ज्ञ टीम त्यांनी ठेवली असून प्रत्येक गाव व तेथील वैशिष्ट्य काय आहेत आणि गावच्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येऊ शकते याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी या गाठीभेटी आहेत. 'मी येतोय आपल्या समस्या ऐकायला आणि त्याचे निवारण करायला' यासारख्या अनेक टॅगलाईन त्यांनी या दौऱ्यात केल्या असून 'जनसमस्या संवाद भेट' असे या दौऱ्याचे नामकरण केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार यांच्या आदेशाने मी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील 248 गावांचा दौरा करणारा असून हा 41 दिवस सलग दौरा असणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील दौरा यापूर्वी देखील मी केला आहे. मात्र या मतदारसंघात नेमके प्रश्न कोणते आहे ते समजावून घेण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा मी करत आहे.
डॉ.प्रतापसिंह पाटील
सरचिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य