धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यानगर बावी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ता.जि.धाराशिव येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्राचार्य जगताप बळीराम उद्धवराव यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद जिल्हा वसंतराव नाईक मागास समाजसेवा मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या वतीने दि.3 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बार कौन्सिलचे सदस्य ॲङ. मिलिंद पाटील धाराशिव जिल्ह्याचे थोर उद्योजक दत्ताभाऊ कुलकर्णी, यवतमाळ जिल्ह्याचे थोर संस्थापक सचिन आडे, विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट मेंबर देविदास पाठक, संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी सदस्य विद्यानंद राठोड, प्रादेशिक कार्यालय लातूरचे लेखा अधिकारी नटवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवी सरस्वती व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मनोहर राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन केले. संस्थेचे सचिव दयानंद मनोहर राठोड यांच्या प्रास्ताविकानंतर मुख्य सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य यांना मूलभूत परिवर्तनाची ओढ असणारा सक्षम नेतृत्व झपाटून काम करणे. प्रसंगी विरोध पत्करणे वय आणि अनुभवानी खूप मोठे पण तेवढेच दिलदार स्वाभिमान न दुखवता वागणारे, चिकाटी निर्णय क्षमता, पाठपुरावा सुलभ संवाद, मार्मिकता हा गुण विकसित करणारे नेतृत्वपीठ बळीराम उद्धव जगताप सहपत्नी मातोश्री समवेत व्यासपीठावर विराजमान मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या व शाळेच्या वतीने भर पेहराव शाल फेटे, दादांचा वाचनाचा व्यासंग लक्षात घेता 04 वेद 10 उपनिषदे 18 पुराणे याचे वाचन व्हावे म्हणून चष्मा आणि सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
त्याचबरोबर त्यांची निष्ठा कार्यप्रणाली त्याग कर्तृत्व शिक्षणाप्रती लगाव याचा सारासर विचार करून संस्थेने त्यांना पूर्ण स्वायत्ता देत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे. आश्रम शाळारुपी या वटवृक्षाच्या फांद्यावर अनेक विद्यार्थी रुपी पक्षी शिक्षण व संस्काराचे धडे घेऊन कर्तुत्वाच्या आकाशात उंच भरारी घेत आहेत. ज्यांची पाने फुले याच जमिनीत खोल रुतलेले आहेत. फांद्या आकाशाला गवसणी घालत आहेत. कर्मरूपी फुलांचा सुगंध आज आसमानात दरवळत असताना गोड फळे समाजासाठी अर्पण करताना जगताप सरांची असणारी तळमळ मिलिंद पाटील यांनी आपल्या वाणी द्वारे स्पष्ट केले. त्याचबरोबर नूतन प्राचार्य दयानंद राठोड यांना शुभेच्छा दिल्या.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगताप सरांच्या जीवन चिंतनाचा एक प्रवाह होता त्या प्रवाहाला विचाराची पवित्रता आणि कर्तुत्वाचा किनारा आहे. या कर्तृत्वामुळेच ते आश्रम शाळेचे आदर्श मुख्याध्यापक म्हणून तब्बल 33 वर्षे सलग मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले याच कामाची दखल घेत विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे. शिक्षकांना प्रशिक्षण मिळावे याकरिता संस्थेने त्यांच्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणून खूप मोठी जबाबदारी देत त्यांच्या कर्तुत्वाला त्यांच्या व्यासंगाला त्याच्यातील निष्ठेला नवी दिशा व उमेद दिली आहे. या सोहळ्यात प्राचार्य मनीष देशपांडे, प्रा. भागवत कापसे, रामदास कोळगे, पांडुरंग लाटे, रामभाऊ पाटील, सूर्यकांत चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण, सुरज चव्हाण, अण्णासाहेब कोल्हटकर बालाजी तांबे, स्वप्निल गंगणे यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संस्थापक कै. मनोहर (आप्पा) राठोड व जगताप सर यांनी भटक्या विमुक्त मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाचा उल्लेख केला. सचिन आडे यांनी जगताप सरांच्या कार्याचा आढावा देत असताना संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यामधील नात्याचा एकमेकावरील विश्वासाचे नातं कसं असतं याची उदाहरण देत स्वर्गीय आप्पांनी त्यांना मानसपुत्र मानल्याचे सांगितले. सत्कारमूर्ती जगताप यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थापक अध्यक्ष कै.मनोहरराव आप्पा राठोड यांनी विश्वास दाखवून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी, पालकवर्ग, मित्रपरिवार जिल्ह्यातील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, कडकनाथ वाडीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मिष्ठान्न भोजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर साकळे व प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.