धाराशिव (प्रतिनिधी)- प्रगती सहकारी पतसंस्था म. धाराशिव या जिल्यातील नामांकीत पतसंस्थेची 2024-2029 या पंचवार्षिक साठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.या निवडणुकीत सर्व 11 संचालक बिनविरोध निवडून आले.

नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली पदाधिकारी निवडीची  सभा निवडणूक निर्णय अधिकारी ए.टी. सोलंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. सदरील बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत नानासाहेब पाटील यांचा तर उपाध्यक्षपदासाठी शाम लालासाहेब जाधव आणि सचिव पदासाठी डॉ. हर्षल राघवेंद्र डंबळ यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे अध्यक्षपदावर प्रशांत पाटील यांची तर उपाध्यक्ष पदासाठी  शाम जाधव आणि सचिव पदासाठी डॉ. हर्षल डंबळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.टी. सोलंकर यांनी जाहीर केले.

यावेळी नूतन संचालक नंदकुमार भुतेकर, शशीकांत वैराळे, रमाकांत घोडके, व्यंकटेश राजे, सुधाकर कुलकर्णी, विजयालक्ष्मी पांढरे, सविता थोरात, विमल यादव उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्यक म्हणून टि.एन. रेडेकर यांनी काम पाहिले. नुतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या सत्कार समारंभीने सभेची सांगता झाली.

 
Top