तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत बाल संसदसाठी निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत शाळा गुणवत्ता पॅनल विजयी झाले.
निर्णय क्षमता वाढविणे, नेतृत्व क्षमता वाढविणे, स्वयं विकास करणे, सहकार्य भावना रुजवणे.,वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे.,वक्तृत्व शैलीचा विकास करणे. विद्यार्थ्यांचे परस्पर संबंध दृढ करणे. इतरांच्या मताचा आदर करणे. विशिष्ट कार्यासाठी पुढाकार घेणे ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून लोकशाहीची रुजवणूकीचा बालसंस्कार व्हावा या हेतूने बाल संसद निवडणुकीत घेण्यात आली. या निवडणुक प्रक्रियेत इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थीनीनी मतदानाचा हक्क बजावला आहे.या निवडणुकीत शाळा गुणवत्ता विकास पॅनलचे चिन्ह पुस्तक होते. तर शाळा परिवर्तन विकास पॅनलचे चिन्ह पेन होते. बाल संसद निवडणुकीत शाळा गुणवत्ता विकास पॅनल(पुस्तक) विजयी झाले. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला व विजयी उमेदवाराची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ही संकल्पना मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांची होती. निवडणूक अधिकारी म्हणून सुशिल क्षिरसागर यांनी काम पाहिले.तर बाल संसद निवडणुकीसाठी प्रतिभा जोगदंड, पल्लवी पवार, ज्योती गाढवे, रामहरी पसारे, मालोजी वाघमारे, काशीनाथ नरसाळे, सरोजिनी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.