धाराशिव (प्रतिनिधी)-आयसीआयसीआय फाउंडेशन च्या माध्यमातून जल पुनर्भरणचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका धाराशिव येथे सुरु करण्यात आले. नैसर्गिक साधनसंत्तीचे जतन व्हावे, जमितनीतील पाणी पातळी वाढावी, पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाऊ नये. पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरावे म्हणून, जिल्हा परिषद धाराशिव, मुख्याध्यापक अळणी, ग्रामपंचायत आळणी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने यासाठी फाउंडेशनकडे पाठपुरावा केला होता.
यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनच्याया फुंडातून जवळपास एक लाख रुपये निधीतून 100 फूट कुपनलिका घेऊन जल पुनर्भरणचे काम सुरु करण्यात आले. या माध्यमातून पाचशे मीटर परिघातील पाणी पातळी वाढणार आहे. तसेच विहीर व कुपनलिकेची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. जिल्हा परिषद आळणी शाळेच्यावतीने आयसीआयसीआय फौंडेशनचे कौतुक केले जात आहे.