कळंब (प्रतिनिधी)- येथील स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अतुल गायकवाड,बाळासाहेब कथले,भाऊसाहेब शिंदे यश सुराणा,नवनाथ पुरी व शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर व आदी शिक्षक उपस्थित होते. मुकबधीर शाळेतील मुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सगळ्यांना बांधल्या व औक्षण केले. एकमेकांना जोडणारा हा सण सामजिक ऐक्याची भावना जागृत ठेण्यासाठी महत्वाचा ठरतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता एकता असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो असे अतुल गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले. या वेळी सर्व विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.

 
Top