तुळजापूर (प्रतिनिधी)- देशात संविधान  सर्वोच्च असताना शरियत सर्वोच्च कसे असा सवाल करुन संविधान व महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना   खरा न्याय भाजप  व पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिला असे प्रतिपादन संविधान जागर याञेचे संयोजक डॉ. तात्यासाहेब वाल्मीक राजेंद्र गायकवाड यांनी तुळजापूरात पञकारांशी संवाद साधताना केले.

प्रारंभी संविधान जागर याञेचे स्वागत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

नंतर पञकारांशी  बोलताना वाल्मीक गायकवाड पुढे म्हणाले कि, ही याञा राज्यात चारशे  किलोमीटर प्रवास करणार असुन यात पन्नास हुन अधिक सभा मेळावे  घेतले जाणार आहे. काँग्रेस व साम्यवादी विचार सरणीच्या लोकांनी भाजप संविधान बदलणार या विषयाला  भावनिक केल्याचा  आरोप केला. संविधान बदलणे म्हणने बाबासाहेबांचा अपमान आहे. हे सहन न झाल्याने 280 संघटना एकञित येवुन  राष्ट्रवादी विचार देशासमोर नेण्यासाठी संविधान  बाबतीत दिशाभूल होतेय ती दुर करण्यासाठी व संविधान अमृत महोत्सव पार्श्वभूमीवर संविधान जागर याञा काढतोय असे स्पष्ट केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी काँग्रेसचे प्रेम बेगडी पुतना मावशीचे प्रेम  असल्याची टीका केली. असंवैधानिक पदाच्या प्रमुख सोनिया गांधी झाल्या. 64 वर्ष काँग्रेसने संविधानसाठी काहीच केले नाही ते भाजप ने केले. संविधान बाबतीत बोंब मारणा-यांनारेच संविधान पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला. आज देशात प्रचंड  प्रगल्भ अशी लोकशाही आहे. संविधान वरचढ विरोधी कायदे कधी नष्ट होणार असा सवाल केला. यावेळी योजना ठोंबरे, नगरसेवक औदुंबर कदम, भाजपचे आनंद कंदले, नरेश अमृतराव, शांताराम पेंदे आदी उपस्थिती होते.

 
Top