कळंब (प्रतिनिधी)- कळंबमध्ये स्वकुळ साळी समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आद्य वस्त्र निर्माता भगवान श्री जिव्हेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पोथी वाचन, आरती, पाळणा, महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मुलांचे व महिलांचे मनोरंजन खेळ आयोजित करण्यात आले व बक्षीस वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कळंब तालुक्यातील सर्व समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जिव्हेश्वर उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश ताटे, उपाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जंत्रे, सचिव अजय जंत्रे व कोषाध्यक्ष सागर महाद्वार यांनी परिश्रम घेतले.

 
Top