परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील पिठापूरी येथील सुपुत्र राजकुमार बाबासाहेब नरुटे याची 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. शेतकरी कुटुंबातील राजकुमार ने स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 राजकुमार यांच्या उज्वल यशाबद्दल राजकुमार चा सत्कार करण्यात आला.यावेळी राजकुमारचे प्राथमिक शाळेचे शिक्षक लहु मासाळ यांच्या हस्ते परंडा येथे सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते तथा संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष जयदेव गोफणे, ढगपिंपरी चे विद्यमान सरपंच बप्पाजी काळे, पत्रकार भजनदास गुडे, निसार मुजावर, विकास जाधव, सुरेश लट्टे, दत्ता कोयले आदी उपस्थित होते.

 
Top