धाराशिव (प्रतिनिधी)- अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गायीचे प्राण वाचविण्याचे कार्य गोसेवकांनी केले. सदरील गायीवर गौरीनंदन गोशाळेचे संचालक गिरीश करपे यांनी गोसेवकांच्या या कार्याचे कौतुक केले.

धाराशिव शहरातील गणेशनगर भागात शुक्रवारी रात्री एका गायीस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गाय गंभीर जखमी झाली होती. तेव्हा ऑटोरिक्षा मेकॅनिक अकबर शेख यांनी सदरील गायीस नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवले. सकाळपर्यंत गायीला हालचाल न करता आल्यामुळे ती जागेवरच पडून होती. ही बाब महेंद्र केसकर या तरुणाने पाहिल्यानंतर मदतीसाठी पावले उचलली. त्यानंतर गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीश करपे यांना फोन करुन गायीवर उपचार करण्याबाबत कळविले. सदरील गायीला महेंद्र केसकर, अकबर शेख, आयान शेख, सुनील गरड, अविनाश कोळी यांनी टेम्पोमध्ये ठेवून उपचारासाठी पाठवून दिले. त्यानंतर गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीश करपे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गायीवर उपचार केल्यामुळे मुक्या प्राण्यास जीवदान मिळाले.  

यासाठी गौरीनंदन गोशाळेचे अध्याक्ष गिरीश करपे, उपाध्यक्ष मनोज अंजीरखाने, यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना वरुण साळुंके, आकाश सुरवसे,  तुषार सराव, नकुल पानसे, संकेत तीर्थकर, सागर पाळणे, श्रीकांत दिवटे, दुर्गेश दिवटे, दिनेश काटे,  अनंत वाघमारे, विद्याधर शेरकर, सदानंद आकोसकर, अमित बांगड,  राज नवले, धीरज खोत,  प्रवीण साळवे, प्रतीक साळुंके, प्रकाश मा या गो सेवकांनी सहकार्य केले.

 
Top