धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी समीर गुलामनबी काजी यांची निवड झाली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव खलील पठाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक करुन या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य करावीत. तसेच हज कमिटीच्या कामकाजात आवश्यक ते बदल व सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top