भूम (प्रतिनिधी)- कोष्टी समाजाची मोठी व्याप्ती असलेल्या ट्रस्ट अध्यक्ष - सचिव व संचालक निवडीसाठी समाजाची मोठी बैठक झाली. यात अध्यक्षपदी विठ्ठल महादेव बागडे यांची सर्वांनुमत निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व समाजातून अभिनंदन केले.
रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी चौंडेश्वरी मंगल भवन येथे समस्त संपूर्ण कोष्टी समाज बांधवांची समाजाची मोठी व्याप्ती विचारात घेता नवीन संचालकाच्या निवडी संदर्भात मोठी बैठक झाली. या बैठकीला समाजातील जेष्ठ अनुभवीसह युवकांची मोठी उपस्थिती होती. थोडा वेळ निवडी संदर्भात ताणतणाव निर्माण झाला. परंतु काही ज्येष्ठांच्या सूचनेनुसार ताणतणाव निवळला आणि सर्वांनुमते संचालक मंडळ निवडण्यात आले. नवनियुक्त संचालक मंडळांमध्ये ट्रस्ट अध्यक्षपदी विठ्ठल महादेव बागडे, उपाध्यक्ष श्याम तुकाराम वारे, सचिव पत्रकार शंकर विठ्ठल खामकर, सदस्य म्हणून सागर ऐडबा टकले, नवनाथ विलास रोकडे, गंगाराम बापूराव भागवत, सुहास कांतलिंग होगाडे, योगेश ज्ञानेश्वर आसलकर, सुरज प्रभाकर फलके, सोमेश राम म्हैत्रे, वैभव नाथ उपरे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ही निवड पुढील पाच वर्षासाठी करण्यात आले आहे.