तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रावण महिन्यातील सोमवारी श्रावण पोर्णिमा आल्याने आज श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर फुलांचा आकर्षक असा आरास केला होता. तुळजापूर शहरसह परीसरात रक्षाबंधन निमित्ताने आज बहीणीने भावाला राखी बांधुन रक्षाबंधन पारंपारिक पध्दतीने साजरा केला.