तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर विकास प्राधीकरण अंतर्गत हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती प्रलंबीत रस्ता सुरु करण्याच्या मागणीसाठी मंदीरासमोरील आर्य चौकात शहरवासियांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
तुळजापूर विकास प्राधीकरण अंतर्गत हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा रस्ता गेली 15 वर्षापासून श्रीक्षेत्र प्राधीकरणात मंजूर असताना देखील प्रलंबीत आहे. हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असुन या रस्ता मुळे शुक्रवार पेठ, मंदीर महाध्दार, भवानी रोड यावरील होणारी वर्दळ पन्नास टक्के कमी होणार आहे. शहरातील सर्वात लांब आणि याला शहरातील लहान मोठे रस्ते जोडले गेलेले आहेत. सदर रस्ता मध्यवर्ती रात्रंदिवस वाहतुक असते. रस्ता लवकर झाल्यास शहरात वाहतुक कोंडीचा बिकट बनलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. वाहतुक पादचारी, व्यापारी, नागरिकांना या एक रस्त्यामुळे सर्वच बाबीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यापुर्वी अनेक वेळा शासनाकडे लोकप्रतिनिधींकडे हा रस्ता होणेसाठी पाठपुरावा करुन ही रस्ता पुर्ण झालेला नाही आणि असे समजते की एकूण 315 कोटी रुपयांपैकी 60 कोटी रुपये प्राधीकरणाकडे शिल्लक आहेत. असे असतानाही रस्ता काम सुरुवात होत नाही. म्हणून रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी याच रस्ता मार्गावरती एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. शासनाने हे रस्ता प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या रस्त्यासाठी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.
हे आंदोलन अशोक मगर, माधवराव कुतवळ, नागनाथ भांजी, अँड, धिरज पाटील, रुषीकेश मगर, प्रकाश देशमुख, सचिन पाटील, दिपक इंगळे, सुनिल रोचकरी, रणजित इंगळे, चिन्मय मगर, सुहास सांळुके, मधुकर शेळके, सज्जन सांळूके, मधुकर शेळके आदीसह शहरवासियांनी यात सहभागी झाले होते.