धाराशिव (प्रतिनिधी) -धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील प्रशालेत  बालहक्कविषयक जनजागृती कार्यक्रम 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.

यावेळी बालहक्क व मुलांच्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. बालविवाहाविषयी माहिती देण्यात आली.बालकासंबंधीच्या विविध योजनांचे आणि चाइल्ड हेल्प लाईन 1098 ची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.चाइल्ड हेल्प लाईनचे सूपरवायझर अमर भोसले,पल्लवी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री.उजणकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

चाइल्ड हेल्प लाईन 1098 जनजागृती उपक्रम प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ए.बी.कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे व चाइल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक  व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.

 
Top