तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे यांच्या वतीने समर्थ परिवार व फिनिक्स फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या आरोग्य विषयक शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
शिबिराचे उद्घाटन एच डी एफ सी बँकेचे शाखाधिकारी आबासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी आयोजित केलेल्या नेत्ररोग तपासणी व गरजूंना मोफत औषधे व चष्मे वाटप शिबिरामध्ये तुळजापूर खुर्द व परिसरातील 150 जणांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली तसेच 130 गरजूंना मोफत औषधे तर 45 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले नेत्रतज्ञ डॉ महेश पाटील , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे, व्हा चेअरमन श्रीकांत भोजने सचिव सज्जन जाधव संचालक राजेंद्र माळी संजय व्हटकर श्रीकांत देशमाने शिवाजी गायकवाड रवींद्र ताटे संतोष इंगळे पंकज अग्रवाल फिनिक्स फाऊंडेशन चे अजिंक्य नन्नवरे प्रसाद पानपुडे विजय नन्नवरे ऋषी पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद खातेदार ठेवीदार बहुसंख्य संख्येने हजर होते संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. यावेळी संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. शिबिरास सोलापूर येथील मल्लिकार्जुन रक्तपेढी मॅनकाईंड फार्मा चे अक्षय जाधव यांचे सहकार्य लाभले शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अभिजित म्हेत्रे अश्विनी तांबे सुनील शेरेकर तानाजी फुलसुंदर भागवत गुंड जावेद शेख श्रीनिवास मुळे गणेश ठेले अशपाक सय्यद मधुकर साळवे सचिन मोरे यांनी परिश्रम घेतले.