धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा हे एक पुरातन शहर आहे. मुख्य गावातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याकारणाने चार चाकीच्या मदतीने पेट्रोलिंग करणे अत्यंत कठीण आहे. म्हणुन आज रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी भुम गौरी प्रसाद हिरेमठ यांचे संकल्पनेतुन परंडा येथे सायकल पेट्रोलिंग ही संकल्पना राबविण्यात येत आहे. दि. 31 जुलै 2024 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते पोलीस ठाणे परंडा येथे सायकल स्क्वाडचे उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी भुम गौरी प्रसाद हिरेमठ, पोलीस निरीक्षक इज्जपवार, परंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. या संकल्पनेच्या प्रभावी अमंलबजावणी मधून शहरातील अत्यंत दुर्गम आणि अरुंद भागामध्ये सायकलच्या मदतीने पेट्रोलिंग करता येईल. तसेच या माध्यमातुन पोलीस प्रशासनाचा सामान्य नागरिकांशी संपर्क वाढेल आणि सर्वात महत्वाचे सदरील उपक्रम राबवित असताना पोलीस अंमलदारांच्या स्वास्थ्यत देखील सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. सदरील उपक्रमासाठी सावळेश्वर ट्रॅक्टर परंडा पांडुरंग काळदाते यांचे सौजन्याने उपलब्ध्ा करुन दिले आहे.