ढोकी (प्रतिनिधी)- लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 104 वी जयंतीचे औचित्य साधून ढोकी ता धाराशिव येथील पंचदीप ग्रुप यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित स्वरूपातील फकीरा या कादंबरीचे वाटप दि.1 ऑगस्ट रोजी भिमनगर ढोकी येथे करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर पंचदीप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विपीन ढवारे यांच्याकडून गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा, महाविद्यालय, पञकार, वकील, डॉक्टर यांना 251 फकीरा कांदबरीचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रंमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून ढोकी गावचे उपसरपंच अमोल समुद्रे, माजी सभापती निहाल काजी, पत्रकार शशीकांत भुतेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रंमाचे सूत्रसंचालन रोहित ढवारे तर प्रस्ताविक ॲड. राजू कसबे यांनी केले. यावेळी गोरख ढवारे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढवारे, समाधान देशमाने, चंद्रकांत ढवारे, माणिक औटी, जगन्नाथ ढवारे, प्रा बाळासाहेब मैंद, प्रा जोगदंड, झुंबर बोडके, राहुल पोरे, लहुजी शक्ती सेनेचे प्रवक्ते अनंत कसबे,निलेश ढवारे, ऋषिकेश दहिरे, अंकुश जाधव,दौलत गाढवे,गुणवंत सुतार,सचिन लोमटे, श्रीकांत ढवारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पंचदीप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विपिन ढवारे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, दरवर्षी प्रत्येक महापुरुषाच्या जीवनावर आधारित असलेल्या कथा कांदबऱ्या,पुस्तके,साहित्य प्रत्येक जयंतीला वाटप करण्याचा संकल्प विपीन ढवारे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. या पूर्वी देखील विपीन ढवारे यांनी आपल्या माता पित्या च्या वाढदिवसाच्या निमित्त भारताचे संविधान वाटप केले होत.  या उपक्रमा बद्दल त्यांचे समाजातून कौतुक केल जात आहे.

 
Top