धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर-संभाजीनगर नॅशनल हायवे क्र. 211 लगत बावी पाटी जवळील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर नशापाणीसह विनापरवाना (अवैध) जुगार सुरु आहे. यामुळे परिसरातील व तालुक्यातील कुटुंबेच्या कुटुंबे उध्दवस्त होत आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांना देखील नाहक त्रास होत आहे. यावर वेळीच जरब बसणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर नॅशनल हायवे लगत बावी पाटी जवळील इमारतीमधील दूसऱ्या मजल्यावर राजरोसपणे सदर जुगार आड्डा सुरु असल्याने नशापाणी सेवनामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे संभाजीनगर-सोलापूर हायवेवर हिट अँड रन च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच या परिसरातील नागरिकांना या नशापाणीसह जुगार अड्डड्यामुळे व संबंधितामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी ॲड.संजय भोरे (जिल्हा समन्वयक), वैभव वीर (तालुका प्रमुख), अजित भिगडे, योगेश गरड, शुभम धनके, ओंकार बागर, घोडके रोहीत, ओमकार घुले आदींच्या निवेदन स्वाक्षऱ्या आहेत.