धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक, क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जिंतूरकर तर सचिवपदी आनंद कुलकर्णी यांची 2024-25 साठी निवड झाली असून नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दि. 16 जुलै 2024 रोजी पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर हे धाराशिव शहरातील नामवंत नेत्रतज्ञ्‌‍ आहेत. तर सचिव  आनंद कुलकर्णी हे धाराशिव शहरातील नामवंत उत्कृष्ट व्यावसायिक आहेत. कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल - डॉ. संदेश गांधी, डॉ. विकास गपाट, धनंजय वाकुरे, डॉ. अनार साळुंके, कुणाल गांधी, बाळासाहेब देशमुख,  अविनाश काळे, इंद्रजित आखाडे, चित्रसेन राजेनिंबाळकर, रमेश सारडा, सुरज कदम, डॉ. अभय शहापूरकर, प्रवीण काळे, अभिजित पवार, किरण देशमाने, सुधाकर भोसले, सुनिल गर्जे, संजय चव्हाण, संजय देशमाने, चंदन भडंगे, डॉ. मीना जिंतूरकर. रोटरी प्रांत 3132 हा महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा आणि 91 क्लबचा मिळून बनलेला आहे.

 
Top