धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सालाबादाप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा प्रशालेने राखली असून तब्बल 35 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता पाचवी तील कु. श्रेया शरद क्षीरसागर हिने राज्यात 9 वा क्रमांक पटकावला आहे. 

 इ . 5 वी मधून 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून प्रशालेत प्रथम कु. श्रेया शरद क्षीरसागर 276 गुण घेऊन राज्यात 9वे स्थान पटकावले तर द्वितीय अन्वी अमित राजे निंबाळकर 250 घेऊन जिल्हयात 12वी तर तृतीय विपुल विलास खुने 240 गुण घेऊन जिल्हयात 22वे स्थान पटकावले.

इ. 8 मधून 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून प्रथम अ.हादी मुदस्सर काझी याने 244 गुण घेऊन जिल्हयात सातवा तर द्वितीय आयुष हर्षल कुलकर्णी याने 238 गुण घेऊन जिल्ह्यात 8 वा व तृतीय कु.क्षितीजा अभिजित गोरे 234 गुण घेऊन जिल्हयात 21 वे स्थान पटकावले.

या यशाबद्दल संस्थेच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात होते. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम,पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, श्रीमती बी.बी. गुंड, राजेंद्र जाधव यांनी इयत्ता 8 वीचे पर्यवेक्षक तथा विभागप्रमुख एन. एन. गोरे, इ. 5 वीचे पर्यवेक्षक व विभागप्रमुख डी.ए. देशमुख व स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचे अध्यापक यांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह व फेटे बांधून  सत्कार करण्यात आला.  यावेळी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top