धाराशिव (प्रतिनिधी)- दर वर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र ज्ञान महामंडळा कडून 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 'सांगा टक्के, बक्षीस पक्के ' अर्थात बोर्डाच्या परीक्षेत विदयार्थांना मार्काचा अंदाज सांगा आणि बक्षिसे जिंका, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  प्रशालेतील सर्व 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र असलेल्या  ‌‘अण्णा इन्फोटेक' मधून सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर क्रमांक पटकावला. यामध्ये इयत्ता 12 वी मधून जिल्हास्तर प्रथम क्रमांक शिंदे प्रणाली दत्तात्रय (बक्षीस रु 2500 चा धनादेश) व जिल्हास्तर तृतीय क्रमांक शेख फैजान रफीक (बक्षीस रु 1500 चा धनादेश) यांनी पटकावला. तर इयत्ता 10 वी मधून जिल्हास्तर प्रथम   दरेकर विश्वजीत विनोद (बक्षीस रु 2500 चा धनादेश), जिल्हास्तर द्वितीय शेलार महादेव शिवाजी (बक्षीस रु 2000 चा धनादेश) यांना मिळाले.

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नावरे, उपप्राचार्य संतोष घार्गे व  उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, धनंजय देशमुख यांच्या हस्ते जिंकलेल्या रकमेचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

 
Top