धाराशिव (प्रतिनिधी)- नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार राजेश विटेकर आज (दि.25 ) तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा सन अँड ओशन कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमदार राजेश विटेकर यांनी आज मंगरूळ ता.तुळजापुर येथील सन अँड ओशन कंपनीस सदिच्छा भेट दिली. नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी येथील कंपनीचे चेअरमन,अधिकारी, कर्मचारी व इतर सहकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी सन अँड ओशन कंपनीचे चेअरमन राजकुमार बापू धुरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी चेअरमनाजकुमार बापू धुरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर  जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तुळजापुर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे,उद्योजक सुभाष आबा धुरगुडे, शैलेंद्र धुरगुडे, शरदचंद्र धुरगुडे, विश्वजीत डोंगरे, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षिरसागर, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, तुळजापूर सा.न्याय  तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान, तुळजापूर विद्यार्थी तालुका सचिव सोहेल शेख, खलिल शेख, दिग्विजय धुरगुडे, सुरज धुरगुडे, सागर धुरगुडे, मनोज धुरगुडे, अमर धुरगुडे, अक्षय धुरगुडे, आर्यन धुरगुडे, सागर लोमटे आदी सहकारी उपस्थित होते.

 
Top