तेर (प्रतिनिधी)-'मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना' याचा लाभ  महिलांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित महिलांच्या बैठकीत अर्चनाताई पाटील बोलत होत्या. यावेळी  स्थानिक महिला व नागरिकांच्या समस्या त्यांनी  जाणून घेतल्या व आवश्यक विकास कामांसाठी निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. सदर योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे व महीला उपस्थित होत्या.

 
Top