धाराशिव (प्रतिनिधी)- उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर यांनी रविवार दि. 7 जुलै रोजी सकाळी आमदार कैलास पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत केले.  प्रसन्न व मंगलमय वातावरणात आमदार पाटील यांच्यासह शहरवासियांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील भजनी मंडळी, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह उपस्थित होते. गजानन महाराज पालखीने सकाळी 10 वाजता शहरातील ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात भोजन व इतर सुविधांसाठी विसावा घेतला. याठिकाणी उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे यांनी स्वागत करून पालखीची पुजा केली. ज्ञानेश्वर मंदिरानंतर धाराशिव शहरात विविध मार्गावरून पालखी महिला मंडळाच्या मैदानावर रात्रीच्या मुक्कामासाठी गेली. 

पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच स्वागताच्या कमानी उभारून पुष्प वर्षाव करण्यात आला. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहार, भोजन व्यवस्था करण्यात आली होती. आमदार पाटील यांनी पंगतीत वाढुन वारकरी मंडळीना सेवा देण्याचा योग साधला. नागरीकांकडून श्री गजानन महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत करण्यात आले.

श्रींचे पालखी सोबत प्रवास करनाऱ्या वारकऱ्यांशी आमदार पाटील यांनी संवाद साधला. यावेळी दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा नेते पंकज पाटील, गणेश राजेनिंबाळकर, नितीन राठोड, ओम भिसे, संदीप शिंदे, कृष्णा देशमुख, मुन्ना पाटील, सुयोग शिंदे, अक्षय जोगदंड, नाना नन्नवरे, तुषार शिंदे, संभाजी दळवी, कृष्णा देशमुख, ओमकार भुसारे आदी उपस्थित होते.


 
Top