कळंब (प्रतिनिधी)- येथील आगारातील आगार प्रमुख राठोड यांची विभागीय कार्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी प्रभारी आगारप्रमुख म्हणून संतोष चंद्रकांत कोष्टी यांची नियूक्ती रा. प. प्रशासनाने केली आहे. त्यांनी आपल्या प्रभारी आगार प्रमुख म्हणून दि. 13 जुलै रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
प्रभारी आगारप्रमुख समोर आगारातील, स्थानकातील अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. कळंब आगारातील अनेक बस नादुरुस्त आहेत. त्यातच यांत्रिक कर्मचारी यांची काम करण्याची पद्धत; त्याचबरोबर बस स्थानकातील घाण पाण्याचा प्रश्न ! बस स्थानकातील स्वच्छतेचे तीन तेरा, याकडे प्रभारी आगारप्रमुख कशा पद्धतीने लक्ष देणार व हे प्रश्न हाताळून मार्गी लावतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आगारात आगारप्रमुख संतोष कोष्टी यांचा विविध संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे, कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, वाहतूक निरीक्षक अभिजित धकतोडे, वाहतूक नियंत्रक सुशील हूंबे, नामदेव जगताप, चेतन गोसावी, शिवाजी बांगर, विलास जाधव, महेश थोरबोले, कल्याण कुंभार, सायास खराटे, अनिल बांगर, गणेश काळे, एजास शेख, गणेश गोरे, राजाभाऊ गोरे,महादेव थोरबोले, आर. के. जोशी, बळीराम कवडे, राहूल तोरगले यासह आगाराती सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सर्व वाहक-चालक यांनी आपन आपली स्वतःची काळजी घेऊन कर्तव्य पार पाडावीत. वाहक चालकांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्याच्या प्रयत्न करु. सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना व रा .प. प्रशासनाला सहकार्य करावे. कळंब आगाराला उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया.- प्रभारी आगार प्रमुख संतोष कोष्टी.