धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड यांनी टाकळी (बें), धुत्ता, कनगरा, नांदुर्गा आदी विविध ठिकाणी गाव भेट दौरा संपन्न झाला.
गाव भेटीदरम्यान गावागावातील ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच युवकांची शेतीवर आधारित उद्योग व रोजगार निर्मितीवर चर्चा करण्यात येत आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या रूपामाता नँचरल शुगर पाडोळी (आ.) व देवसिंगा (बु.) येथील रुपामाता नॅचरल शुगर च्या माध्यमातून जास्तीतजास्त शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणार असल्याचा विश्वास यावेळी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना दिला. तसेच या संवादा दरम्यान गावागावातील जनतेच्या वैयक्तिक अडचणीसह सार्वजनिक प्रश्नांवर वीज, रस्ते, पाणी तसेच आरोग्य सुविधां बाबत लोकांकडून प्रश्न मांडण्यात येत आहेत. भेटीत संबंधित गावातील सरपंच- उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गटातील सदस्या व युवकांचा सहभाग व प्रतिसाद मिळत असल्याचे ॲड. गुंड यांनी यावेळी सांगितले.