कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंतीच्या उत्सव समितीची बैठक लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून गोरोबा ताटे, शाहू अण्णा गायकवाड, विलास कदम , केरबा देठे , कैलास कदम यांनी मार्गदर्शन करून या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शंकर ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे या समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून राहुल कांबळे, कोषाध्यक्ष श्रावण ताटे, उपकोशाध्यक्ष नारायण ताटे, बापू कसबे , सचिव पदी सिकंदर वैरागे, सहसचिव बापू ताटे यांची निवड करण्यात आली आहे. यावर बैठकीसाठी विकास गायकवाड, सुनील देठे, खंडू ताटे, तानाजी वैराग्य ,लखन कसबे, विष्णू शिरसाठ, सतीश साठे, लखन ताटे ,अक्षय रणदिवे , विकास रणदिवे, सिद्धेश्वर कदम ,लक्ष्मण कदम, आनंद कदम यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .