धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच सतत विद्यार्थ्या साठी रोजगार संबंधित संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. त्या अनुषंगाने कॉलेजने आयोजित केलेल्या पुणे स्थित राधे इंजिनीअरिंग सर्व्हिसेस आणि सोलुशन कंपनी या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू दिनांक 24 जुलै 2024 रोजी आयोजित केला होता. कंपनीने आयोजित केलेल्या मुलाखतीत विद्यार्थ्यांचे सिव्हिल या संबंधित ज्ञान आणि इंटिरियर, लेआऊट डिझाइन संदर्भातील संगणक प्रणालीतील ऑटोकॅड आणि 3 मॅक्स यातील कौशल्य बघून 2 विद्यार्थिनींची निवड केली.
निवड झालेल्या विद्यार्थिनी कु. मानसी तोडकर ,कु. मंजुश्री शिंदे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सत्कार केला. यावेळी ते म्हणाले महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या रोजगारा विषयी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात महाविद्यालयाने भरपूर कंपन्याचे ड्राईव्ह आयोजित केले आहेत. कॅम्पस ड्राईव्ह मध्ये डायरेक्टर श्री. सचिन वाळके आणि श्री. संतोष बिराजदार यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
राधे इंजिनीअरिंग सर्व्हिसेस आणि सोलुशनचे डायरेक्टर सचिन वाळके यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यात कंपनी मध्ये असलेल्या इंटर्नशिप आणि रोजगार संबंधित असणाऱ्या संधी विषयी माहिती दिली. राधे इंजिनीअरिंग सर्व्हिसेस सोल्युशन्सचे मुख्यालय पिंपरी चिंचवड, औद्योगिक क्षेत्र पुणे येथे आहे. 2012 मध्ये व्यावसायिकांच्या टीमने स्थापन केलेली राधे इंजिनीअरिंग सर्व्हिसेस अँड सोल्यूशन्स हाय-एंड कॅड / कॉम्पुटर एडेड मॅनुफॅक्टयरिंग / सीएई समर्थनाद्वारे विविध उद्योग वर्टिकल्ससाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स प्रदान करते.
राधे इंजिनीअरिंग सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स ही भारतातील ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, कन्झ्युमर अँड मेडिकल इंजिनीअरिंग आणि हेवी अँड इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग डोमेनमधील अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.