सोलापूर (प्रतिनिधी)-दिल्ली आणि महाराष्ट्रातील (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) प्रसार माध्यमांना संबोधित करताना माननीय रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2024-25 च्या बजेटमध्ये महाराष्ट्राला विक्रमी 15,940 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की हे 2009-14 दरम्यान महाराष्ट्राला प्रति वर्ष दिल्या जाणाऱ्या सरासरी 1,171 कोटी रुपयांच्या वाटपाच्या जवळपास 13 पट आहे. या प्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करण यादव, पीएचओडी आणि मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूरचे इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्यांच्या संबंधित मुख्यालयात उपस्थित होते. सोलापुर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज कुमार दोहरे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री अंशुमाली कुमार, गति शक्ती व्यवस्थापक श्री शैलेंद्रसिंह  परिहार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचलन व्यवस्थापक जे. एन  गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) श्री जगदीश, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. लखनजी झां  अधिकारी उपस्थित होते. 

 मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथील माध्यम प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले होते.

2024-25 च्या बजेटची मुख्य वैशिष्ट्ये खाली दिली आहेत:

2024-25 मध्ये मध्य रेल्वेसाठी एकूण योजना खर्च 10,611.82 कोटी रुपये आहे, जो 2023-24 मध्ये मध्य रेल्वेसाठी योजना खर्च (नेट) 10,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

2024-25 दरम्यान महाराष्ट्रासाठी एकूण वाटप 15,940 कोटी रुपये आहे, जे 2009-2014 दरम्यान महाराष्ट्रासाठी सरासरी वाटप 1,171 कोटी रुपये प्रति वर्षाच्या जवळपास 13 पट आहे.

नवीन लाईन्स  1,941 कोटी रुपये  

अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ (250 किमी)  275 कोटी रुपये. बारामती - लोनंद (54 किमी)  330 कोटी रुपये, वर्धा - नांदेड (यवतमाळ-पूसद मार्गे) (270 किमी)  750 कोटी रुपये. सोलापूर-उस्मानाबाद - तुलजापूर मार्गे नवीन लाईन (84.44 किमी)  225 कोटी रुपये, धुळे (बोरविहीर). नरडाणा (50.6 किमी)  350 कोटी रुपये. कल्याण-मुर्बाड उल्हासनगर मार्गे (28 किमी)  10 कोटी रुपये. 

गेज रूपांतरण 300 कोटी रुपये  

पाचोरा-जामनेर (84 किमी)  300 कोटी रुपये. दुहेरिकरण / 3 लाईन / 4 लाईन  1,615 कोटी रुपये. कल्याण-कसारा 3 लाईन (68 किमी)  85 कोटी रुपये. वर्धा-नागपूर 3 लाईन (76 किमी)  125 कोटी रुपये. वर्धा-बल्लारशाह 3 लाईन (132 किमी)  200 कोटी रुपये. इटारसी-नागपूर शेष (280 किमी)  320 कोटी रुपये. पुणे-मिरज-लोंडा दुहेरिकरण (467 किमी)  200 कोटी रुपये. दौंड-मनमाड दुहेरिकरण (247 किमी)  300 कोटी रुपये. वर्धा-नागपूर 4 लाईन (79 किमी)  120 कोटी रुपये. मनमाड-जळगाव 3 लाईन (160 किमी)  120 कोटी रुपये. जळगाव-भुसावळ 4 लाईन (24 किमी)  40 कोटी रुपये. 

वाहतूक सुविधा आणि इतर कामे  236 कोटी रुपये  

कर्जत - रिसीट आणि डिस्पॅच लाइन्सचे विस्तार, अप यार्डला कर्जत-पनवेल आणि कर्जत-पलासदरी दरम्यान चौथ्या लाईनशी जोडणे  10 कोटी रुपये. लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचिंग सुविधांचे संवर्धन  5 कोटी रुपये. पनवेल-कलंबोली कोचिंग टर्मिनस फेज- स्टेज-  10 कोटी रुपये. सीएसएमटी प्लेटफार्म 10, 11, 12, 13 चे 24 कोचसाठी विस्तार  10 कोटी रुपये. पुणे प्लेटफार्मचे 24/26 कोचसाठी विस्तार  25 कोटी रुपये. गाइगाव - लांब हॉल ट्रेनच्या हाताळणीसाठी यार्ड पुनः संरचना  4.25 कोटी रुपये. वर्धा-चितोडा - दुसरी चॉर्ड लाईन (4.26 किमी)  4 कोटी रुपये. इटारसी - आमला नागपूर - वर्धा - भुसावळ - जळगाव (713.86 किमी)  25 कोटी रुपये. भुसावळ - बदनेरा साइड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाउन मुख्य लाईन, अप दिशेने अतिरिक्त द्वीप प्लेटफार्म  11 कोटी रुपये. हडपसर - उपग्रह टर्मिनल म्हणून विकास  2 कोटी रुपये. अजनी - उपग्रह टर्मिनल म्हणून विकास  7.5 कोटी रुपये. 

रस्ते सुरक्षा कामे  आरओबी / आरयूबी  756 कोटी रुपये  

विक्रोळी आरओबी  5 कोटी रुपये. निफाड आरओबी  5 कोटी रुपये. दिवा आरओबी  18 कोटी रुपये. फूलगाव आरओबी  5 कोटी रुपये. नागरगाव आरओबी  5 कोटी रुपये. दिवा  वसई आरओबी एलसी क्रमांक 1, 4, 6, 8, 9 बदल  9 कोटी रुपये. दिवा  पनवेल आरओबी एलसी क्रमांक 6, 9 बदल  3 कोटी रुपये. कल्याण  इगतपुरी आरओबी एलसी क्रमांक 51 बदल  16.1 कोटी रुपये.  

महानगरीय परिवहन प्रकल्प  789 कोटी रुपये  

(2023-24 मध्ये 1,100 कोटी रुपये, 2022-23 मध्ये 575 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 650 कोटी रुपये)  

एमयूटीपी फेज-  100 कोटी रुपये. एमयूटीपी फेज-  300 कोटी रुपये. एमयूटीपी फेज– 389 कोटी रुपये.

ग्राहक सुविधा  1,022 कोटी रुपये  

ट्रॅक नूतनीकरण  1,320 कोटी रुपये  

पूल कामे, बोगदा कामे  192 कोटी रुपये  

सिग्नलिंग आणि दूरसंचार कामे  183 कोटी रुपये  

विद्युतीकरण प्रकल्प  338 कोटी रुपये.

 
Top