धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल मंगळवारी दि.23.07.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 14 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,850 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 258 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 19 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,55,380 रूपये आहे. यावरुन 14 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 14 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
भुम पो ठाणेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-छायाबाई मच्छिंद्र काळे, वय 41 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव या 07.30 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,050 किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-मनिषा तानाजी काळे, वय 28 वर्षे, रा. कल्याणनगर ता. भुम जि. धाराशिव या 05.05 वा. सु. कल्याण नगर पारधी पिढी भुम येथे अंदाजे 24,000 किंमतीचे 300 लि.गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-पुजा बिरुदेव पवार, वय 28 वर्षे, रा. एम.एस.ई.बी जवळ भुम येथे जि. धाराशिव हे 05.30 वा. सु. एम.एस.ई.बी जवळ भुम येथे अंदाजे 5,000 किंमतीची 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-ताईबाई अंकुश पवार, वय 50 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव या 05.50 वा. सु. कल्याणनगर पारधी पिढी भुम येथे अंदाजे 20,000 किंमतीची 250 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-लहु अंकुश् पवार, वय 45, वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 06.00 वा. सु. कल्याणनगर पारधी पिढी भुम येथे अंदाजे 16,000 किंमतीची 200 लि. गावइी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
ढोकी पो.ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मच्छिंद्र गणा पवार, वय 60 वर्षे, रा. पारधी पिढी तेर ता. जि. धाराशिव हे 13.00 वा. सु पारधी पिढी तेर येथे अंदाजे 1, 200 किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-संजय लाला शिंदे, वय 39 वर्षे, रा. सिडफॉर्म येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 06.20 वा. सु गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 23,000 किंमतीची 160 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 40 लि. गावइी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
उमरगा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सलीम मकबुल शेख, वय 62 वर्षे, रा.डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 07.45 वा. सु उमरगा शिवारात धनु निवृत्ती राठोड यांचे शेताजवळ अंदाजे 1,45,400 किंमतीचे 2800 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 60 लि. गावइी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
कळंब पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-लताबाई संजय पवार, वय 49 वर्षे, रा. कल्पनानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 06.15 वा. सु कल्पनानगर पारधी पिढी कळंब येथे अंदाजे 11,200 किंमतीचे 140 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
शिराढोण पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-नागेश धोंडीराम वाघमारे, वय 40 वर्षे, रा. शिराढोण, ता. कळंब जि. धाराशिव हे 07.30 वा. सु शिराढोण येथे अंदाजे 950 किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
मुरुम पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-जगदीश गुलाब पवार, वय 39 वर्षे, रा. शास्रीनगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे 07.20 वा. सु शास्त्रीनगर तांडा दाळींब येथे अंदाजे 2,300 किंमतीची 23 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.