तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आचार्य कुटुंबात पाचव्या पिढीपासून श्रीमद् भागवत सप्ताह अखंडपणे चालू असून यावर्षी श्रीमद् भागवत सप्ताहास 15 जुलैपासून प्रारंभ होत आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे आचार्य कुटुंबात पाचव्या पिढीपासून श्रीमद् भागवत सप्ताह चालू आहे. हा श्रीमद् भागवत सप्ताह बाळाचार्य आचार्य यांच्यापासून सुरुवात केली.त्यानी हस्तलिखित केलेले श्रीमद् भागवत पुराण असून यावर्षी त्याला 197 वर्षं पूर्ण होतात. त्यानतर श्रीनिवास आचार्य यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांच्यानतर गुंडाचार्य आचार्य यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.त्यानतर अच्युतराव आचार्य यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांचे निधन 1992 झाले. त्यांचे जेष्ठ चिरंजीव हभप बाळासाहेब आचार्य यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. श्रीमद् भागवत सप्ताहास 15 जुलैला प्रारंभ होत असून श्रीमद भागवत सप्ताहाची सांगता 21 जुलैला होणार असून प्रतिदिन सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत संहीता वाचन, दुपारी अडीच ते साडेचार अर्थ निरूपण सायंकाळी 8 ते आरती होणार असून 21 जुलैला गुरू पौर्णिमेला श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता होणार असून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या श्रीमद् भागवत सप्ताहाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन हभप बाळासाहेब आचार्य यांनी केले आहे.