धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असताना गावठी पिस्तुली विषयी त्यांना माहिती मिळाली. पोलिस पथक तातडीने सालेगाव येथे जावून गावठी पिस्तुल व डबलबोर काडतुसासह दोन व्यक्तींना अटक केली आहे.

लोहारा पोलीस ठाण्याचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना माकणी येथे आले. पथकास गुप्त माहिती मिळाली की, सालेगाव येथील े रणजीत कालीदास यादव, वय 27 वर्षे, सुरज रुपसेन देशपांडे, वय 19 वर्षे यांनी गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोर चे काडतुस आणले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लोहारा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली. त्याचे ताब्यात 20 हजार 500 किंमतीचे गावठी पिस्टल(बंदुक) व डबलबोरचे काडतुस मिळून आले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्टल व डबलबोरचे काडतुस जप्त केले. त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे लोहारा येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, भारतीय न्याय सहिंता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतले, परि. पोलीस उप निरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार राठोड, ढवण, विजय घोडके यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

 
Top