कळंब (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब येथे कै.संभाजी शिवाजी कापसे याच्या पुण्यतिथी निमित्त मुकबधीर मुलांना शैक्षणिक साहित्य व स्वादिष्ट नाष्टा देण्यात आला.
कै.संभाजी हा पण दिव्यांग होता, त्यामुळे मुकबधीर मुलांच्या समवेत त्याचे पुण्यस्मरण करावे व कै.संभाजीच्या आत्म्यास शांती लाभावी.यासाठी कै.संभाजीची आई सुनंदा शिवाजी कापसे व .शिवानी कापसे, शंकर महाराज हुंबे, जयाताई कापसे, बालाजी कापसे, हीराताई यादव, किसनाबाई शिंदे, गणेश जाधव, यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व नाष्टा वाटप करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक अश्रूबा कोठावळे, जाधवर सर कर्मचारी उपस्थित होते.