कळंब (प्रतिनिधी)- येथील फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरला जाणाऱ्या पायी यात्रेकरू साठी नाष्टा-फराळ व वैद्यकीय मोफत सेवा बार्शी रोड लगत राधेश्याम मंगल कार्यालय येथे दि. 5 जुलै 2024  ते 12 जुलै 2024 पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत चे दरम्यान ठेवलेली आहे. 

यासाठी आदल्या रात्री जेथे जेथे दिंड्या मुक्कामी असतात तेथे तेथे जाऊन संघटनेच्या वतीने यात्रेकरूंना निमंत्रण देऊन संपर्क क्रमांक देण्यात येतो. ठिकाण व वेळ सांगीतली जाते. यात्रेकरूंना नाष्टा- फराळ दिला जातो. गरजेनुसार वॉशरूमची सोय उपलब्ध करुन दिली जाते. गरजूंना मोफत वैद्यकीय औषधोपचार करून सोबत औषधे दिली जातात. गरजेप्रमाणे ॲम्बुलन्सची मोफत सेवा दिली जाते. 

यासाठी संघटनेचे पदाधिकारी, शितल कवडे, गोपाळ उबाळे, परमेश्वर मोरे, डॉ.अभिजित लोंढे, बजरंग घुले, डॉ. भगवंत जाधवर, डॉ. सुधीर आवटे, आश्रुबा कसपटे, शशिकांत बारटक्के, दत्ता राखुंडे, बाबासाहेब पवार, उमाकांत बोंदर, डॉ सुशिल ढेंगळे, गोविंद खंडेलवाल, गोविंद रणदिवे, राजाभाऊ नागटिळक. आयएमएचे डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. शितल कुंकूलोळ, डॉ. दिनकर मुळे आदी परिश्रम घेत आहेत.

 
Top