तुळजापूर (प्रतिनिधी)- पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक राज्याचा सरहद्द वर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या बाबतीत सार्वजनिक  बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हे तालुक्यात चर्चचा विषय ठरला  आहे. तुळजापूर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाल्याने ग्रामीण भागातील वाहक, प्रवाशी ञस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभाराचा फटका सर्वानाच बसत आहे. लोकसभा निवडणुक नंतर आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. 

तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फ मोठ्या प्रमाणात रस्ते केले आहे. या रस्तातील बहुतांशी रस्ते सातत्याने दुरुस्त करावे  लागत आहेत. दुरूतीचा खर्च हा रस्ता बनवणे खर्चा पेक्षा अधिक होत असल्याची चर्चा आहे. अनेक गावांना तालुक्याला जोडणारा

डांबरी रस्ताच राहिला नसून रस्त्यांवरील डांबर  निघून गेले आहे. अनेक ठिकाणी केवळ मातीचे रस्ते व गुडघ्याएवढे खड्डे झाले आहेत. याबाबत बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने दुरुस्ती करणे आवश्यक होते. सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा प्रचंड ञास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे असुन अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना  नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तीन तालुक्याच्या सिमेवरील रस्ता केल्या पासुन अनेक वर्ष दुरुस्ती झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.  सलगरा दि., नळदुर्ग कडे जाणारा  यासह अनेक   रस्ताची दुरुस्ती अभावी प्रचंड दुरावस्था झाली आहे. कार्ला येथे बंजारा समाज वस्तीकडे जाणाऱ्या रस्ताची प्रचंड दुरावस्था झाल्याने बंजारा  बांधवांना ये-जा करणे कठीण बनले आहे. तालुक्यातील अनेक  रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरुन प्रवास करताना शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यात संततधार पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. 

 
Top