तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे रविवार दि. 21 जुलै रोजी गुरुपोर्णिमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे गुरुपोर्णिमा उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. गुरुपोर्णिमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आला होती.
आज गुरुपोर्णिमा रविवार सुट्टी पार्श्वभूमीवर शहरातील देविचे महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजी बुवा, महंत मावजीनाथ बुवा, महंत इच्छागिरी सोमवार गिरी महाराज तसेच श्रीदत्त अरण्य महाराजांचा मठात जावुन तेथील देवते गादी समाधी दर्शन घेवुन गुरुवर्य महंतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसह शहरवासियांनी गर्दी केली होती.