उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा तालुका तेली समाज सेवाभावी संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव आणि सत्कार सोहळा 2023-24 कार्यक्रम शांताई मंगल कार्यालय उमरगा येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास अध्यक्ष जेष्ठ तेली समाज संघटनेचे मार्गदर्शक शंकरराव घोडके, प्रमुख उपस्थिती धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,लोहारा तालुका अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,कळंब अध्यक्ष अशोक चिंचकर, उमरगा तालुका तेली समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष कलशेट्टी,अमर कोरे, तालुका उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी,यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात संताजी जगनाडे महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शुभेच्छा व पुढील शैक्षणिक जिवनात अनमोल असे मार्गदर्शन केले.समाजातील विद्यार्थी घडला तर कुटुंब,समाज पुढे जाण्यासाठी मतद होणार आहे.आजचे विद्यार्थी हेच समाजाचे व कुटुंबाचे प्रतिक आहेत.तुम्ही चांगले घडलात तर समाज पुढे जाईल व प्रगती झाल्या शिवाय राहणार नाही.तुम्ही भविष्य आहे.तसेच उमरगा तेली समाज संघटनेकडून असेच समाज उपयोगी कार्यक्रम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व मदत करण्यासाठी जिल्हा कमिटी कायम सोबत राहील असे आश्वासित केले.

साहित्यिक भैरवनाथ कानडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनाव पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या पाल्यावर पहिल्यांदा प्रेम करायला शिका तेव्हाच आपला पाल्य शिखरावर पोहोचेल.त्याच्या लक्ष ठेवा आपण त्याच्यासाठी वेळ काढतो वेळ देतो तेव्हाच आपला पाल्य पडल्याशिवाय राहत नाही.पाल्याने कुठलिही गोष्ठ काळजीपूर्वक ऐकली पाहिजे तेव्हाच तुम्ही घडाल.पाल्याच मुल्य हे त्यांच्या दिसण्यावर नसते तर त्याच्या बुद्धीमत्तेवर असते.सतत शिका कष्ट करा यश मिळाल्या शिवाय राहणार नाही.उंच भरारी घेण्यासाठी सतत प्रयत्न करा.असे मार्गदर्शन केले.

या कार्यासाठी खंडू म्हेत्रे, उमरगा तेली समाज संघटनेचे कार्याध्यक्ष सिध्देश्वर कलशेट्टी,उमरगा तालुका मार्गदर्शक परमेश्वर साखरे,उमरगा तेली समाज संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख शिवकुमार दळवी,उमरगा तालुका मार्गदर्शक बाबुराव कलशेट्टी, उमरगा तालुका मार्गदर्शक बाळचंद्र टोमपे,प्रा.मनिषा अंबुसे, भाग्यश्री साखरे,उमरगा शहराध्यक्ष धनराज कलशेट्टी, उमरगा तालुका उपाध्यक्ष महादेव साखरे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कलशेट्टी,मल्लिनाथ दिक्षिवंत,सतिश कोरे, सदाशिव रोकडे,संदिप अंबुसे, सुर्यकांत रेवते,महेश लुटे नाईक चाकुर, राजकुमार अंबुसे मुरूम,शेखर अंबुसे,सिद्धू घोडके आदींची उपस्थिती होती.

 
Top