धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव या महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील  नॅक कार्यालय, बेंगलोर, कर्नाटक यांच्या वतीने 4 थ्या सायकलसाठी नॅक पुनर्मूल्यांकन समितीने दिनांक 27 व 28 जून 2024 रोजी भेट दिली. या समितीमार्फत महाविद्यालयाला 'अ' दर्जा सी.जी.पी.ए. 3.23 गुणांकनासह प्राप्त झाला  आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सदर समितीचे चेअरमन हरियाणा येथील कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. रजनिश कुमार शर्मा हे होते. समितीचे समन्वयक तामिळनाडू येथील गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूट, गांधीग्राम येथील अधिष्ठाता, प्रोफेसर डॉ. राथकृष्ण लक्ष्मण हे होते. तर सदस्य मिझोराम येथील गव्हर्मेंट आयझॉल नॉर्थ कॉलेज आयझॉल चे प्राचार्य डॉ. एस.एच माटे हे होते.

दोन दिवसीय तपासणीनंतर नॅक समितीच्या अहवालानुसार नॅक कार्यालय, बेंगलोर यांनी दि. 5 जुलै रोजी महाविद्यालयाचा हा निकाल जाहीर केला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पहिले व एकमेव महाविद्यालय आहे की, ज्या महाविद्यालयाला डीबीटी स्टार दर्जा प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय म्हणून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची ओळख आहे. नॅक तपासणीमध्ये महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे . त्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या मा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, आजीव सेवक श्री श्रीराम साळुंखे या मान्यवरांसह महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच धाराशिव पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील विविध नामवंत मंडळीकडून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख, नॅक समन्वयक प्रा.डॉ. एस .एस फुलसागर, सह समन्वयक डॉ. संदीप देशमुख, सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे यांच्यासह सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top