तुळजापूर (प्रतिनिधी) -शासनामार्फत नव्याने ई-पॉस मशिनचे रास्त भाव दुकानदारांना वाटप करण्यात आले आहे. नवीन ई-पॉस मशिनवर शासनाकडून जोडण्यात आलेले सर्व्हर बाबत अडचणी त्या तात्काळ सोडविण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता असोसिएशन जिल्हा उस्मानाबाद.यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतत सर्व्हर बंद पडणे, सर्व्हर मध्ये एरर येणे. सर्व्हर मध्ये टाईम आऊट होणे. आर.डी. हिरवा न होणे. मोबाईलद्वारे व्हॉयफाय कनेक्ट न होणे. वरील प्रमाणे धाराशिव जिल्हयातील संपूर्ण रास्त भाव दुकानदारांना या अडचण येत आहेत. त्यामुळे त्या महिन्यातील वाटप ई-के. वाय. सी करणे कठीण झाले आहे. लाभार्थी रास्त भाव दुकानांकडे वारंवार चकरा मारत आहेत. त्यामुळे त्यांच्यात व आमच्या मध्ये तेढ निर्माण होवून तक्रार होत आहेत. यात जिल्हा प्रशासनाने संबंधीत विभागास वरील सर्व अडर्चीी तात्काळ दुर करण्याचे आदेश व्हावेत. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्रफुल्लकुमार शेटे, जिल्हा कोषाध्यक्ष काकासाहेब कासार, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष शिवानंद बबे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनेष सोनकवडे, जिल्हा सचिव राजकुमार पवार, जिल्हा सहसचिव प्रसाद राजे निंबाळकर यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन तहसिलदार,तहसिल कार्यालय, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, भुम, परंडा यांनाही सादर केले आहे.