धाराशिव (प्रतिनिधी)- फ्लाइंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूलमध्ये 'नॅशनल एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट ऑर्गनायझेशन' भारत सरकार आयोजित भव्य 'ऑल इंडिया 'स्वच्छ भारत' कला प्रतियोगिता' चे आयोजित करण्यात आले. वर्ग नर्सरी पासून ते वर्ग दहावी (10वी) पर्यंत 230 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

शासनाच्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सांगत प्राचार्य चतुर्वेदी सरांनी “स्वच्छता करणे हे वेगळे काम/ओझे नसून सर्वांचे कर्तव्य आहे आणि सर्वांनी स्वच्छता सेवेत सहभागी होऊन आपल्या देशासाठी योगदान द्यायलाच हवे“ सांगत सर्वांना संबोधित केले. फ्लाईंग किड्स शाळेचे सामाजिक कार्यात, विशेषता सार्वजनिक क्षेत्र स्वच्छता अभियान राबवण्यात मोठे योगदान राहिले आहे. शालेय कला विभागाअंतर्गत अधिनियम पद्धतिने शालेय स्तरावर स्पर्धा घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध संकल्पना आणि विद्यार्थ्यांचे विविध रंगकाम कौशल्य सदरील स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाले तसेच विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात दिलेल्या वेळेत रंगकाम पूर्ण केले. स्पर्धेचा निकाल लवकरच तयार करण्यात येईल व विद्यार्थ्यांचे चित्रे राज्यस्तरीय चाचणीसाठी पुढे पाठवाव्यात येतील. तसेच विद्यालयीन उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे नाव व श्रेणी नुसार नावे राज्यस्तरीय साठी पाठवण्यात येतील. नामांकन मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रशस्तीपत्र, मेडल व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


 
Top