तेर (प्रतिनिधी)- प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकभक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री. संत गोरोबा काका यांच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त 17 जुलैला भाविक भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती .मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त दर्शनासाठी तेर येथे श्री. संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात दर्शनासाठी येत होते.धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री .संत गोरोबा काका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त तेर येथील सोहम कानडे यांनी स्वखर्चाने एक हजार लिटर केशर युक्त दुधाचे वाटप भाविकभक्तांना केले.