धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील शासकीय कृषी महाविद्यालय, विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता व जागृती विकास योजनेअंतर्गत हिंगळजवाडी येथे वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वृक्ष दिंडी काढत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले यावेळी वृक्षदिंडीत विद्यार्थी  पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले व झाडे लावा झाडे झाडे जगवा अशा विविध घोषणा देत होते व नागरिकांना वृक्ष लागवड करण्याबाबत आव्हान केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.एस.पेरके आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  शालेय व ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व जोपासण्याच्या आव्हान केले.

याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डी. एस पेरके , कार्यक्रम समन्वय डॉ. के. एस. थोरात कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.एच. घंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच डॉ. आर .ए .पाटील , सरपंच श्री सुरेश नाईकनवरे ,उपसरपंच सौ.सत्यशीला वाकुरे ,ग्रामविकास अधिकारी श्री .बापू काळे,  सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत शेळकेने केले कृषीदूत रोहित टिळक , आदित्य उगलमुगले ,तौफिक तांबोळी , प्रदीप कुमार गहेन ,रोहित पाटील , समर्थ रितपुरे यांनी परिश्रम घेतले तर सौरभ पवार यांनी आभार मानले.

 
Top