कळंब (प्रतिनिधी)-कळंब शहर हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक आहे. येथील जनतेस मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. सदर योजना अत्यंत जूनी झाली असून वाढत्या लोकसंख्येला पुरेशी नाही. या गोष्टीचे अवलोकन करून संजय मुंदडा कळंब नगर परिषदेचा प्रभारी नगराध्यक्ष असताना जून 2021 मध्ये पालीकेत पाणीपुरवठा बळकटीकरण योजनेचाठराव घेऊन व स्वतः पाठपुरावा करून या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करवून घेतला. नंतर तांत्रिक मान्यता, पाणी आरक्षण वाढवणे व विविध मान्यता मिळवण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा व शिवसेना निरीक्षक नितीन लांडगे यांनी पालकमंत्री तानाजीराव सावंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक खात्याची कार्यालयीन मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले व ते सत्कारणी लागून प्रस्ताव परिपूर्ण रित्या सादर झाला. परंतु त्यादरम्यान लोकसभेची आचारसंहिता लागली. व त्या कारणाने मान्यता प्रलंबित राहिली.
काल दिनांक 18/07/2024 गुरुवारी श्री नितीन लांडगे, संजय मुंदडा, गणेश जगताप, निखिल घोडके, संजय मुंडे यांनी पालकमंत्री मा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले व कळंब शहरातील पाणीपुरवठ्याची अवस्था निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री महोदयांनी 69 कोटी च्या या योजनेस तात्काळ मान्यता दिली असून लवकरच सदर पत्र पालीकेस प्राप्त होईल. या योजनेच्या पुर्णत्वानंतर कळंब शहरातील नागरिकांना दररोज किंवा कर्मचारी यंत्रणा कमी पडल्यास एक दिवस आड मुबलक पाणीपुरवठा होईल. या कामात पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना निरीक्षक श्री नितीन लांडगे, कळंबचे भुमीपुत्र पत्रकार श्री राहुल झोरी यांनी भरीव मदत केली.