तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयच विविध रिक्त पदांमुळे सलाईनवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे 30 खाटाचे ग्रामीण रूग्नालय  आहे. या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी दोन कक्ष असून एक कक्ष बाळांतीनीसाठी आहे.तर बाळांतपण करण्यासाठी एक, तर कूटूंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी एक कक्ष असून रूग्नाच्या तपासणीसाठी दोन कक्ष आहेत.तर रूग्नाची नोंदणी व औषध देण्यासाठी एक कक्ष असून एक कक्ष औषधी साठा ठेवण्यासाठी आहे तर एक कक्ष कार्यालयीन कामासाठी आहेत एक कक्ष क्ष किरण कक्ष आहे..दररोज सरासरी अंदाजे 175 रूग्ण याठिकाणी तपासणी व उपचारासाठी येत असतात.सध्या या रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकारीच असून याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक वर्ग 1,एक वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, वैद्यकीय अधिकारी वर्ग 2(एनसीडी),दंत शल्यचिकित्सक वर्ग 2, वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 (डिलिव्हरी एल 2 पाँईट ) ही पदे रिक्त आहेत.दोन वैद्यकीय अधिकारी यांच्यावरच कामाचा प्रचंड ताण पडत आहे.रिक्त पदांमुळे तेर येथील ग्रामीण रुग्णालयच सलाईनवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.कर्मचारी वेळेवर येतात? व शासकीय वेळेपर्यंत रूग्णालयात राहतात ? व मुख्यालयी किती कर्मचारी राहतात हा संशोधनाचा विषय आहे.

 
Top