कळंब (प्रतिनिधी)-  येथील श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखा कळंबच्या  विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी या मल्टीस्टेटचे  संचालक मंडळ फरार झाले आहे. यामुळे कळंब परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  बीड येथील साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी यांनी जादा  व्याज दराचे आम्हीस  दाखवून ठेवीदार यांची फसवणूक केली.

सन 2017 पासून ते 30 जून 24 या काळात बँकेच्या संचालक मंडळांनीएक अनोखी योजना आखून  कट्टरचून फिर्यादी बाळासाहेब भुजंगराव कुपकर व 62 वर्षे रा. सुर्डी ता. केज जि. बीड  व इतर  ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमीश  दाखवून आकर्षित करून श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को  क्रेडिट सोसायटी, लि. बीड शाखा कळंब  येथे ठेवी ठेवण्यास सांगितले सदर ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदार हे वारंवार ठेवीची रक्कम परत मिळणे बाबत शाखेत गेले असता त्यांना उडवाडवीचे उत्तरे दिली सदरची शाखा बंद करून निघून गेले.  यावरून फिर्यादी व ठेवीदार यांची 1 कोटी 90 लाख 53  हजार 690 रुपये .  रुपयाची फसवणूक झाली आहे .अशी फिर्याद बाळासाहेब कुपकर यांनी आरोपी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी ली. बीड, शाखा कळंब चे शाखा अधिकारी नितिन जरिचंद भिसे, साधना शाहीनाथ परभणे (अध्यक्ष), श्रीराम सूर्यभान बोबडे (उपाध्यक्ष) तर संचालक म्हणून शाहीनाथ विक्रमराव परभणे, सुभाष आप्पासाहेब उगले,  लक्ष्मण विक्रमराव परभणे, सौ अर्चना रवींद्र सुपेकर, अर्जुन पंडित कांबळे,  संजय पाटील बुवा सावंत, शिवाजी निवृत्ती खोड, भगवान भानुदास काळे, विठ्ठल ज्ञानदेव जाधव, सह  साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लि. शाखा कळंब येथील सर्व कर्मचारी यांच्यावर कळंब पोलीस ठाणे येथे व भ.द. वि. स. कलम 420, 409, 406, 120  ब  सह कलम 3, 4, महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

 
Top