धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र,धाराशिव या केंद्राच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचा रामकृष्ण परमहंस पहाविद्यालयास नॅक समितीच्या तपासणीमध्ये 'अ'दर्जा प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे कार्य करत आहे. या केंद्राचे समन्वयक डॉ. डी एम शिंदे, सहकारी ज्ञानेश्वर बारवकर व इतर सर्व गुरुदेव कार्यकर्त्याकडून माननीय प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे आभार मानले.